स्वरांजलि
अंदाजे २०वर्षांपुर्वी औरंगाबादला देव बुवांच्या दोन शिबिरात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले .<o:p></o:p>
दोन /तीन दिवसांचे हे शिबिर असायचे .त्या मध्ये प्रथमतः सर्व शिबिरार्थीची गाण्याद्वारे ओळख असायची .प्रत्येकाने स्टेज वर जाऊन आपले नाव , कुणाकडे शिकता वगैरे जुजबी गोष्टी सांगुन एखाद्या गाण्याच्या 4-5ओळी गायच्या असत .<o:p></o:p>
प्रत्येकाने गायले की त्यावर देव बुवा अतिशय मार्मिकपणे , नेटके आणि मुद्देसूद टिप्पणी करत .अगदी योग्य पट्टी पासुन अक्षरशः प्रत्येक शब्दाचा अर्थ , त्या शब्दाचा योग्य उच्चार , योग्य उच्चारासाठी लागणारी तयारी , त्या दृष्टीने करावयाचा रियाज या आणि अश्या अनेक गोष्टींचा शिबिरात समावेश असे . सर्वसमावेशक अशी त्यांची शिबिरे होत .त्यात अजुन एक म्हणजे देव बुवा , शिबिरांमध्ये नामांकित कवींची , त्यांनी स्वरबद्ध केलेली गीते देखील अतिशय बरकाव्यासकट शिकवत .त्यांच्या स्वतःच्या कविता देखील असत .<o:p></o:p>
त्यांचा थोडासा मिश्कील स्वभाव विद्यार्थ्यांना सांगताना डोकावत असे मात्र , कुणाचीही फजिती करण्याचा त्यात हेतु नसे.<o:p></o:p>
या शिबिरांच्या आधी अहमदनगरच्या एका स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी देव बुवा आणि पं.अभिषेकी बुवा आले होते . बक्षीस वितरणानंतर ते मुद्दाम थांबले , सगळ्यांशी उत्तम संवाद साधला , कोणाकोणाला बक्षिसे कुठल्या विभागात मिळाली आहेत ? कुठले भावगीत , कुठले नाट्यपद , कुठली गज़ल ..सगळ्या गोष्टींची वर - वर नाही तर नीट चौकशी करून अतिशय सखोल असे विश्लेषण केले . ज्यामुळे आम्हा सगळ्यांना जाणीव झाली की , आपण ज्या गाण्यावर बक्षीस मिळवले त्यात किती गोष्टी राहुन गेल्या ..<o:p></o:p>
पुढील वेळीस गीत सादर करताना त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आचरणात आणायच्याच अशी मनाशी खुणगाठ बांधली ! <o:p></o:p>
देव बुवांनी , गाताना बसायचे कसे , श्वासाचे उत्तम नियोजन , श्वासाचे सहजपणे साकारण्याचे तंत्र , गाण्याचा अर्थ समजुन घेण्याची क्रिया तसेच समजलेले गीत मांडण्याची क्रिया , कवीचा - संगीतकाराचा दृष्टिकोन , ध्वनीक्षेपक वापरण्याचे तंत्र , या आणि अश्या अनेक गोष्टींसोबत त्यांचे उत्तम मार्गदर्शनपर भाषण ऐकणे म्हणजे मेजवानीच ! (वरील सर्व मुद्दे या खेरीज अनेक गोष्टी त्यांच्या "रियाजाचा कानमंत्र " तसेच "शब्दप्रधान गायकी "या पुस्तकांत नमूद केलेले आहेत .)<o:p></o:p>
गाणं समजाऊन सांगण्याची तळमळ , भाव व्यक्त करण्याची शिकवण , अवघड अक्षरं गाताना बाळगायची सावधगिरी , या सारख्या विषयांपासुन ते गाताना मुख/तोंड कसे असावे , आकारात गाताना किती 'आ' असावा या बाबी पण ते सप्रयोग स्पष्ट करायचे .<o:p></o:p>
काय -किती गोष्टी शिकायला मिळाल्या हे मांडता येणंच कठीण ! <o:p></o:p>
शिबिराव्यतिरिक्त त्यांनी मला ते जिथे निवासाला होते तिथे बोलवले होते ,मी व माझी आई त्यांना भेटायला गेलो असता (माझ्या मावशीची त्यांची ओळख ) गप्पा झाल्यावर माझ्याकडुन एक -एक गाणे म्हणुन घेऊन , त्यातले सुक्ष्म निरीक्षण करून बारकावे मला सोप्या शब्दात उलगडून सांगितले ते ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात .. .. ..<o:p></o:p>
मला जर गाण्यासाठी , त्यातील भाव व्यक्त करण्यासाठी दाद मिळाली तर त्याचे संपूर्ण श्रेय मी देव बुवांना देते 🙏🏻🙏🏻<o:p></o:p>
त्यांनी अतिशय उत्तम दृष्टिकोन बहाल केला आहे , मी काही त्यांच्याकडे कायम स्वरूपी शिकले नाही , त्यानंतर मला त्यांना भेटता देखील आले नाही , पण त्या -त्या वेळी त्यांनी जी मोलाची शिकवण दिली ती कायम आचरणात आणण्याचा माझा प्रयत्न राहील !<o:p></o:p>
<o:p> </o:p>
💐🙏🏻🙏🏻💐<o:p></o:p>
सौ .नीलिमा भागवत<o:p></o:p>
<o:p> </o:p>
Neelima Maam photo<o:p></o:p>
Posted from my blog with SteemPress : https://muziclub.com/2018/11/06/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a4%bf/
Leave स्वरांजलि to:
Read more #musiclessons posts
Best Posts From Muziclub
We have not curated any of muziclub's posts yet. But you can encourage our curation team to review posts by visiting them regularly and by referring other readers. Because we give priority to frequently read content.
More Posts From Muziclub
- Liberation in the Lockdown
- This Is Me - Iris,The Greatest Showman Cover Live At CRCC
- Creep - Iris, Radiohead Cover Live At CRCC Pune
- Chaudhary - Folktribe, Live At CRCC Pune
- The Pretender - Eureka,Foo Fighters Cover Live At CRCC Pune
- Carnival Of Rust - Minor6,Live At CRCC Pune
- November Rain - Guns N Roses Cover, Live At CRCC Pune
- Runaway Baby - Minor6, Bruno Mars Cover Live At CRCC
- Still Loving You - Minor6, Scorpions Cover Live At CRCC Pune
- Tere Mere Saath - ZeroGravity, Lucky Ali Cover Live At CRCC Pune